Wednesday, July 9, 2008

वेडे असाल तर हरकत नाही..

वेडे असाल तर हरकत नाही..
शहाणे बनून जगू नका..
इन्द्रधनुश्याच्या रंगांकडे ..
"Light Refraction" म्हणुन बघू नका..

वेडे असाल तर हरकत नाही..
पाउस कोसलताना छत्री फेकून द्याल..
दोन्ही हात लाम्ब पसरून..
ओल्या गवतावर अंग झोकुन द्याल..

वेडे असाल तर हरकत नाही..
शर्यत लावून पळता येइल..
म्हातारीच्या उड़नार्या कापसाबरोबर..
फुंकर मारत खेळता येइल..

वेडेच राहून जगा असे..
शहान्यांना अजून आयुष्य कळलच नाही..
त्यांच्या आकलनाला नियमांची मर्यादा..
फुलपाखराच गाण त्याना वळलच नाही..

मैत्री

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....

तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ...

साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायच

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जालायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्शणाक्शणाला बदलतात
आणी म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात

साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं...
साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं

ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं जसा सिंह रानात!

आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं
असेलही चंद्र मोठा त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून घरभर शिंपत रहायचं
साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं