Friday, September 10, 2010

झुळुक

झुळुक......

.
.
.
वेलीवरचं ते फ़ुल.....
अल्पजिवीचं ठरतं ,
उमलताना अलगद....
अख्खी रात्र दरवळतं !
.
.
.
पहाटेचं ते दवं....
क्षणभंगुर ठरतं ,
अवघ्या निसर्गाला....
तारुण्य बहाल करतं !
.
.
.
गवताचं ते पातं ......
चिरडताचं कोमेजतं ,
सोसाट्याचा वारा....
नि पावसातही तगतं !
.
.
.
मुठभर हे ह्रुदय.....
केवढ सारं सोसतं ,
सुखाची एक झुळुक....
अन खुदकन हसतं !

No comments: