पाउस पुन्हा येतोय...
हिरव्या हिरव्या झाडांची...
पिवळी पानं गळू लागली...
कोवळ्या नवीन जन्मासाठी...
झाडं पावसाची वाट बघू लागली...
बघ आज झाडाची व्यथाही...
तो पाउस ऐकतोय... आणि...
तुझी आठवण घेउन...
पाउस पुन्हा येतोय...
हिरवे हिरवे माळरान सारे...
रख रखीत दिसू लागले...
धरतीवरील मूक-जीव सारे...
काळ्या नभाची वाट पाहू लागले...
बघ, त्यांची व्यथा ऐकून...
पाउसही आभाळात भरून येतोय...
आणि... तुझी आठवण घेउन...
पाउस पुन्हा येतोय...
आता पाउस पुन्हा येइल...
सोबत तुझी आठवणही येइल...
ओल्या मातीच्या सुगंधातही...
ओल्या प्रीतिचा गंध येइल...
मग, पाउस बरसात राहील... निवांत आभाळातून...
अन नितांत... माझ्या... डोळ्यांतून...
बघ, तुझी आठवण घेउन...
पाउस पुन्हा येतोय...

No comments:
Post a Comment