कदाचित तिला तुझा
खरेपणा कधी
जाणवलाच नसेल...
तुझ्या डोळ्यांमधले
अफाट प्रेम
तिला डोळे असून
दिसलेच नसेल...
तुझ्या स्पर्शातला
हळवेपणा
तिने कधी
स्पर्शिलाच नसेल...
तुझ्या मिठीतला
गोडवा
तिने कधी
अनुभवलाच नसेल...
तुझ्या श्वासांचे
पावित्र्य तिला
कळलेच नसेल...
तुझ्या स्पंदनांची आतुरता
तिला कधी
उमगलीच नसेल...
तू देऊ पाहत होतास
सात जन्माची साथ,
पण सात पावलांचा भार
तिला पेलावलाच नसेल...
कधी पेलावलाच नसेल...
Friday, September 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment